सगर (गवंडी) समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजा भगीरथ यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थी, नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार साेहळा, हळदी-कुंकू समारंभाचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य गोपीनाथ सगर होते. स्वागताध्यक्ष हरिभाऊ इदलकंठे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बापूराव राठोड, गणेश गायकवाड, विठ्ठल सगर, डॉ. मल्लिकार्जुन सुरशेट्टे, गुंडेराव अनमोल, प्रा. मनोहर होनाळीकर, सागर बिरादार, विठ्ठल सगर, दत्ता सगर, पुंडलिक सगर उपस्थित होते. सगर समाजाचे राष्ट्राच्या निर्मितीत योगदान आहे. माणसांना छाया देण्याचे कार्य करणारा हा समाज कष्टाळू, प्रामाणिक व निष्ठावंत आहे. शैक्षणिक क्षेत्रात या समाजाने केलेली प्रगती निश्चितच अभिनंदनीय आहे. राजकीय क्षेत्रातही निश्चित स्थान मिळवून देण्यासाठी कायम आपल्यासोबत असल्याचे केंद्रे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मंगनाळे यांनी तर आभार दत्तात्रय सगर यांनी मानले.