उदगीर येथील श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य वसंत कुलकर्णी, कमांडंट कमांडर बी. के. सिंह, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, प्रा. प्रदीप कोठारे, उमाकांत नादरगे, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बालाजी मुस्कावाड यांनी केले. आभार नागेश पंगू यांनी मानले.
उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोरील गांधी गार्डनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शहराध्यक्ष मंजूरखाँ पठाण, नगरसेवक विजय निटुरे, विक्रांत भोसले, अनिल मुदाळे, फय्याज शेख, शमशुद्दीन जगर, बाजार समितीचे संचालक सुभाष धनुरे, ज्येष्ठ कामगार नेते रंगा राचुरे, अहमद सरवर, अनिल मुदाळे, श्रीनिवास एकुर्केकर, रवींद्र हासरगुंडे, अलिम तांबोळी, विनोद सुडे, कुणाल बागबंदे, अशपाक सय्यद, शफी हाश्मी, बजरंग शाहीर, संदीप पाटील, सद्दाम बागवान, बालिका मुळे, आदी उपस्थित होते.
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रासेयोच्या वतीने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, डॉ. अजित मुळजकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. धनंजय जाधव, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. गाेविंद शिवशेट्टे, डॉ. नरेश पिनमकर, प्रा. सूर्यकांत वाकळे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुभाष बेंजलवार यांनी, सूत्रसंचालन साधना पाटील, दीपाली सूर्यवंशी यांनी केले. आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी मानले.