किल्लारी : खरिपातील सोयाबीन, मूग, तुरीवरील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र, लातूर आणि रावसाहेब पाटील ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ बेद्रे, देशमुख, मताई, कृषी सहाय्यक काळे उपस्थित होते. वातावरणात सतत होणारा बदल तसेच सध्या सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास तो रोखण्याविषयीची माहिती देण्यात आली.
यावेळी चेअरमन दीपक पाटील, बाळासाहेब घोडके यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांच्यावतीने अडचणी मांडल्या. कृषी विज्ञान केंद्राच्या पथकाने प्रत्यक्ष बालाजी माळी यांचा प्रक्षेत्रावर जाऊन सोयाबीन व मूग पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दाखवून नियंत्रणासाठीचे उपाय सांगितले. यावेळी महेंद्र जिडगे, शिवराज गावकरे, हंसराज बिराजदार, सतीश बनसोडे, रतन माने, किशोर भोसले, प्रशांत रणदिवे, सोमनाथ बाळापुरे, वसंत बिराजदार, सिद्धेश्वर बिराजदार, नाना भोसले, नीळकंठ सावळगे, युवराज भोसले, विवेक पाटील, दयानंद भोसले, रणजित पाटील, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.