शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
2
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
3
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
4
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
6
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
7
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
8
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
9
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
10
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
11
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
12
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
13
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
14
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
15
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
16
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
17
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
18
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी
19
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
20
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

उदगीर, मुरुड येथे पोलिसांच्या धाडीत सव्वा काेटींचा गुटखा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: August 13, 2024 15:24 IST

लातूर पाेलिसाची कारवाई : सात जणांविरुद्ध गुन्हा

लातूर : जिल्ह्यातील उदगीर, मुरुड येथे साेमवारी विशेष पाेलिस पथकाने धाडी टाकल्या. यावेळी तब्बल १ काेटी २४ लाख ८८ हजारांचा गुटखा, वाहने जप्त केली आहेत. याबाबत उदगीर मुरुड पाेलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याचे आदेश पाेलिस अधीक्ष सोमय मुंडे यांनी दिले असून, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले यांच्या पथकाने अवैध व्यवसायाची माहिती मिळविली. मुरुड येथे माेठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची पडताळणी करुन स्थागुशाच्या पथकाने साेमवारी सकाळी मुरुड येथील गुट्टे नगरात दोन ठिकाणी घरावर छापा मारला. यावेळी गुटखा, सुगंधित पानमसाला असा ६६ लाख ४० हजार १०१ रुपयांचा, दुसऱ्या ठिकाणी ५३ लाख ३२ हजार २४० असा एकूण १ कोटी १९ लाख ७२ हजार ३४१ रुपयांचा गुटखा, चारचाकी वाहन जप्त केले आहे. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात अनिल वसंत कापसे, विशाल गुट्टे, संदिपान बाबुराव विटेकर, बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया आणि भैरू नरसू गुट्टे ( सर्व रा. मुरुड) यांच्याविराेधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

ही कारवाई पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, विनोद चिलमे, रामहरी भोसले, माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली.

उदगीरात दुसऱ्या दिवशी गुटखा जप्त...उदगीर येथील पाेलिसांनी दुसऱ्या दिवशीही गुटखा पकडला आहे. कर्नाटकातून नांदेड जिल्ह्यात वाहतूक करण्यात येणारा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा गुटखा, चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख १६ हजार २०८ रुपयांचा मुद्देमाल साेमवारी पहाटे जप्त केला आहे. उदगीरमधील बिदर मार्गावर कमानीनजीक कारमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, कारसह गुटखा पाेलिसांनी पकडला. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात माधव गणपती अभंगे, मारोती दिंगाबर अभंगे (दोघेही रा. मंगनाळी पो. पेठवडज ता. कंधार जि. नांदेड) यांच्याविराेधात गुन्हा नोंद केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर