शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

By संदीप शिंदे | Published: June 26, 2023 5:12 PM

माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे यांनी केले स्वागत

उदगीर : आषाढी एकादशी निमित्त ज्ञानोबा, माऊली, तुकारामांच्या गजरात उदगीर शहरात शालेय विद्यार्थी व वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात सोमवारी दिंडी काढली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकऱ्यांचे गोल रिंगण झाल्यावर माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले.

उदगीर येथील सद्गुरू शंकरलिंग महाराजांच्या मठात माजी आ. सुधाकर भालेराव, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून ज्ञानोबा, माऊली, तुकारामांचा गजर करीत निघाली. माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , पोलीस उपअधीक्षक दिलीप भागवत यांनी या दिंडीचे दर्शन घेवून स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वांचे गोल रिंगण करण्यात आले. यावेळी दिंडीतील महिला व आ. संजय बनसोडे यांनी फुगडी खेळली. यावेळी दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या दिंडीसाठी राजकुमार मोगले, अजित शिंदे, प्रशांत मांगुळकर, अश्वजित पाटील,आशिष अंबरखाने, आशिष पाटील, शिवा उप्परबावडे, नरेश सोनवणे, विकास तपसाळे, सतीश पाटील मानकीकर, चंद्रकांत टेंगेटोल, राहुल शहा, संदीप पाटील, विजय पारसेवार, नारायण वाकुडे, रामदास जळकोटे, श्रीनिवास एकुर्गेकर, प्रशांत जगताप, राजू मोरे, मदन पाटील, अक्षीत हेरकर आदींनी पुढाकार घेवून ही शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढली.

१५ शाळेतील विद्यार्थी, ३५ गावांतील भजनी मंडळांचा सहभाग...या दिंडीत शहरातील १५ शाळांतील विद्यार्थी व ३५ गावांतील भजनी मंडळी यांच्यासह नामदेवराव कदम, अमोल निडवदे, मोतीलाल डोईजोडे, प्रा. पंडित सूर्यवंशी, नवनाथ गायकवाड, विश्वनाथ मुडपे, मनोज पुदाले, ॲड. दत्ता पाटील, धनाजी मुळे, उत्तराताई कलबुर्गे, सरोजा वारकरे, अनिता जाधव, गणेश गायकवाड, वैजनाथ गिरी यांच्यासह शहरातील भाविक सहभागी झाले होते. दुधीया हनुमान मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आरती व महाप्रसादाचे वाटप करून ही दिंडी विसावली.

टॅग्स :laturलातूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022