लातूर - उदगीर, निलंग्यातील सरवडी, औसा तालुक्यातील उजनी परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ आंबा, टरबूज, खरबूज, द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर टोमॅटोचा चिखल झाला.अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील राशीच्या कामात व्यत्यय आला. शेतकºयांसह व्यापाºयांची धावपळ उडाली होती़ शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ दुपारी अडीचच्या सुमारास औसा शहरासह तालुक्यातील नांदुर्गा, गुबाळ, मंगरूळ, किल्लारी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली़ त्यानंतर जोरदार वादळी वाºयास सुरुवात झाली़ बेलकुंड, उजनीमध्ये गारांसह मुसळधार पाऊस झाला़ दापेगाव येथील शाळेचे पत्रे उडून गेले आहेत़ दापेगावसह नागरसोगा, जवळगा परिसरातही पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील हडोळी, सरवडी परिसरात गारांचा पाऊस झाला़ उदगीर शहरातही गारा पडल्या. शिरूर अनंतपाळ, देवणी व चाकूर तालुक्यालाही अवकाळीने झोडपले़ त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानाला भरपाई मिळणार की नाही याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे़लोहाºयात बाजारकरूंचे हाललोहारा शहरासह तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लोहाºयात शुक्रवारी आठवडी बाजार भरला होता. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारकरूंचे काही प्रमाणात हाल झाले. तालुक्यातील बेलवाडी, माकणी, सास्तूर आदी भागातही हलका पाऊस झाला.वीज पडून दोन जनावरे दगावलीउमरगा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, गहू, द्राक्ष, आंबा, कलिंगड व काकडीसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय, तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन जनावरे दगावल्याच्याही घटना घडल्या.शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास तालुक्यातील नारंगवाडी, माडज, नाईचाकूर, मुळज, तुरोरी, तलमोड, कोळसुर, जगदाळवाडी, आष्टाजहागीर आदी गावांच्या शिवारात अचानक वादळी वारा व गारपीट झाली. यात काढणीला आलेली ज्वारी व गव्हाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले.कडबा भिजल्याने चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वादळी वाºयामुळे आंबा, द्राक्षबागा व कलिंगड पिकाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, मुळज येथे तुकाराम भालके यांच्या शेतात बैल तर त्रिकोळीत रवींद्र हंगरगेंची गाय वीज पडून दगावल्याची माहिती तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.उस्मानाबादला अवकाळी पाऊसउमरगा (उस्मानाबाद) तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, गहू, द्राक्ष, आंबा, कलिंगड व काकडीसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. दोन ठिकाणी वीज पडून दोन जनावरे दगावली. लोहारा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बेलवाडी, माकणी, सास्तूर आदी भागातही हलका पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:54 AM