शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

हरंगुळ ते पुणे रेल्वेसेवा मंगळवारपासून सुरू होणार

By आशपाक पठाण | Published: October 06, 2023 9:27 PM

विशेष रेल्वे तीन महिने धावणार: दररोज दुपारी ३ वाजता निघणार पुण्याला.

आशपाक पठाण, लातूर : मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली हरंगुळ (लातूर) ते पुणे रेल्वेसेवा मंगळवार १० ऑक्टोबरपासून दैनंदिन सुरू होत आहे. मात्र, लातूर रेल्वेस्टेशनऐवजी ही गाडी हरंगुळ स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दररोज दुपारी ३ वाजता हरंगुळ येथून निघणारी ही रेल्वे पुण्यात ९ वाजता पाेहचणार आहे.

मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल. येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.

१५ डब्याची रेल्वे, इथे आहे थांबा...

हरंगुळ- पुणे ही रेल्वे १५ डब्याची आहे. त्यामुळे जवळपास एक हजार ते बाराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. हडपसार, उरूळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आदी स्थानकावर थांबेल. ८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा सुरू होणार आहे.

प्रवाशांची चांगली सोय झाली...

पुणे ते हरंगुळ ही विशेष रेल्वे १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. मुंबई-लातूर रेल्वेत जागा न मिळणाऱ्या प्रवाशांना ही रेल्वे फायद्याची ठरणार आहे. दिवसा सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हा प्रवास सुखकर होईल. - मोतीलाल डोईजोडे. सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती.

लातूर स्टेशनवर यायला हवी...

पुणे हरंगुळ ही नविन विशेष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. पण ती गाडी दीड तास हरंगुळ स्टेशनवर उभी राहणार आहे. पुढे लातूरला येणार नाही, हे चुकीचे आहे. लातूरच्या स्टेशनवर आल्या प्रवाशांची सोय होईल. रेल्वे बाेर्डाने यावर त्वरीत निर्णय घ्यावा. - शिवाजी नरहरे, दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, लातूर.

प्रतिसाद मिळाल्यास कायम राहील...

दिवाळी सणात फायदा होईल. कोणतीही नवीन गाडी सुरू करीत असताना काही दिवस प्रयोग केला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला की ती गाडी कायम केली जाते. त्यामुळे आपल्या भागातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. परिणामी, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहील.  शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे रेल्वे सल्लागार समिती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे