श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातून एक, तर कनिष्ठ विभागातून तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी कनिष्ठ विभागातील गटात दिशा बेलुरे हिला प्रथम पारितोषिक मिळाले. दुसरे पारितोषिक स्नेहा गुंळगे हिला मिळाले. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, प्राचार्य डॉ. एस.डी. लोहारे, उपप्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे आदींनी केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डी.एस. मुंदडा, डॉ. म.ई. तंगावार, प्रा. एन.आर. हाके, प्रा. जे.के. मुल्ला, प्रा. मनोहर भालके, प्रा. संतोष अनकले उपस्थित होते.
कॅप्शन :
उदगीरमधील श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या वतीने दिशा बेलुरे व स्नेहा गुळंगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डी.एस. मुंदडा, डॉ. म.ई. तंगावार, प्रा. एन.आर. हाके, प्रा. जे.के. मुल्ला, प्रा. मनोहर भालके, प्रा. संतोष अनकले यावेळी उपस्थित होते.