शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

घर मालकाच्या गळ्याला चाकू लावून दीड लाखाचा ऐवज पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 2:52 PM

१ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल लंपास

ठळक मुद्देपाईपच्या सहाय्याने उघडली दरवाजाची आतली कडी

उजनी (जि़ लातूर) : घर मालकाच्या गळ्यास अज्ञात चार- पाच चोरट्यांनी चाकू लावून १ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६३ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना औसा तालुक्यातील उजनी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

उजनी मोडनजीक सहशिक्षक रघुनाथ वळके यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चार- पाच चोरट्यांनी घराच्या खिडकीतून पाईप घालून दरवाज्याची आतील कढी काढली. त्यानंतर घरात प्रवेश केला़ बेडरुममधील कपाटाचे दार काढत असताना आवाजाने घरमालक  उठले. तेव्हा चार- पाच जण दिसले. त्यांनी चोरट्यांना दरडावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गळ्याला चाकू लावून काहीही बोलायचे नाही, अन्यथा जीवे मारु अशी धमकी देत, कपाटाच्या चाव्या काढून घेतल्या़

घरातील १ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिणे आणि मोबाईल असा एकूण १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, जाताना चोरट्यांनी घराला बाहेरुन कडी घातली. त्यामुळे घरमालकांनी शेजाऱ्यांना आवाज देऊन ही माहिती दिली. याप्रकरणी रघुनाथ वळके यांच्या फिर्यादीवरुन भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांकडून पाहणी...घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, भादा ठाण्याचे पोनि़ संदीप भारती यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

टॅग्स :RobberyचोरीlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी