शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लातूर जिल्ह्यात धो..धो..बरसला! ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी; नद्या, नाले, ओढेही झाली वाहते

By आशपाक पठाण | Updated: June 11, 2024 17:40 IST

खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणीसाठी दिलासा दिला.

लातूर : मृग नक्षत्राच्या प्रारंभी यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. मागील पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यात विविध भागात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून तब्बल ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. चाकूर तालुक्यातील नळेगावनजीक घरणी नदीवरील तात्पुरता उभारण्यात आलेल्या पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक इरतत्र वळविण्यात आली आहे.

खरीप पिकाच्या पेरणीसाठी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणीसाठी दिलासा दिला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अनेक ठिकाणी रात्रभर सुरूच होता. जिल्ह्यातील दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेकांच्या शेतातून पाण्याचे पाट वाहिल्याने माती वाहून गेली आहे. लातूर तालुक्यातील मुरूड, तांदुळजा, सारसा, टाकळगाव शिवारात काही शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस निलंगा, औसा तालुक्यात झाला आहे.

कोणत्या तालुक्यात किती पाऊस...लातूर जिल्ह्यात सोमवारी रात्री ६३.७ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १३५.८ मि.मी. पाऊस झाला आहे. एका रात्रीत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसात सर्वाधिक ८५.८ मि.मी.पाऊस निलंगा तालुक्यात झाला आहे. जळकोट तालुक्यात केवळ ९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका पडलेला पाऊस:लातूर ७७.५औसा ८४.१अहमदपूर ४१.२निलंगा ८५.८उदगीर १६.२चाकूर ७७.३रेणापूर ७८.२देवणी २४.६शिरूर अनंतपाळ ७४.३जळकोट ९.८

सात महसूल मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस....जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसात या भागात नद्या, नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. लातूर तालुक्यातील मुरूड ११५.८, कासारखेडा १०६.८, औसा तालुक्यातील लामजना १०२, किल्लारी १०२, निलंगा १११.५, चाकूर १००, नळेगाव मंडळात ११२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. या भागातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

या महसूल मंडळात धो..धो..बरसला...मृग नक्षत्राच्या प्रारंभी जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. मागील पाच दिवसांपासून रोज पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यातील सहा महसूल मंडळात १००मिमी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झाला आहे. लातूर महसूल मंडळात ६९.३, बाभळगाव ६९.३, हरंगुळ बु. ६९.३, तांदुळजा ६८.३, चिंचोली बल्लाळनाथ ६८.३, कन्हेरी ७४.८, औसा ८१.८, मातोळा ८१.८, भादा ८१.८, बेलकुंड ८१.८, किनी ९१.५, पानचिंचोली ८१, निटूर ८७.८, औराद शहाजानी ८४, कासार बालकुंदा ८०, अंबुलगा ९९.०, मदनसुरी ९७.३, कासारसिरसी ६६.८, हलगार ८४.०, भुतमुगळी ६६.८, नळेगाव ७८.८, रेणापूर ८२, पोहरेगाव ६५.५, पानगाव ९८.८, पळशी ८४.५, शिरूर अनंतपाळ ८७.८, हिसामाबाद महसूल मंडळात ८७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने उघडीप दिल्यास पेरणीला प्रारंभ...जिल्ह्यात उदगीर, जळकोट, देवणी तालुका वगळता इतर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. खरीपाच्या पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीला लागणार आहेत. त्यासाठी एक ते दोन दिवस पावसाने उघडीप दिली की लागलीच पेरण्याला प्रारंभ केला जाईल, असे सुगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र