हटकरवाडी येथे पादचाऱ्यास जीपची धडक
लातूर: पायी घराकडे चालत जात असताना हटकरवाडी शिवारात भरधाव वेगातील एम.एच.२४ व्ही. ५८८३ या क्रमांकाच्या जीप चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. याबाबत अनुराधा दयानंद अर्जुने (रा.सुगाव ता. चाकूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.एच. २४.व्ही. ५८८३ या क्रमांकाच्या जीप चालकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.
जुना औसा रोड येथून दुचाकीची चोरी
लातूर: जुना औसा रोड परिसरात पार्किंग केलेल्या एम. एच. २४ व्ही. ८०४३ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत किशोर गोविंद किनिकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक गिरी करीत आहेत.
चाकूर येथून कारची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
लातूर: चाकूर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एम.एच. २४ ए. एफ. ३५२५ व्या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारची चोरी झाली. याबाबत अजय जनार्दन इजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वामी करीत आहेत.
म्हैस विकत घेण्यासाठी गेल्यानंतर दुचाकी चोरीला
लातूर: शहरातील कडबा मार्केट येथील पशुधनाच्या बाजारात म्हैस विकत घेण्यासाठी गेल्यानंतर बाजारात पार्किंग केलेल्या एम. एच.२४ एक.डी.९७०८ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. सदर दुचाकी कडबा मार्केट कमानी समोर पार्क केली होती. मात्र त्या जागेवर दिसून आली नाही. याबाबत गांधी चौक पोलिसात हनुमंत मुरलीधर मोरे (रा. खोपेगाव ता. लातूर)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुळ मार्केट परिसरातून मोबाईलची चोरी
लातूर: गुळ मार्केट परिसरातून वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत ज्ञानेश्वर सोपान नरवटे (रा. टाकळगाव ता. रेणापूर. हल्ली मुक्काम इंडिया नगर लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.
वर्कशॉपमधून दुचाकीची चोरी
लातूर बार्शी रोडवरील एका वर्कशॉपच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या एम.एच. २४ ए.एच. ४७९२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत ऋषिकेश शिवाजी लोहार (राहणार माऊली नगर हरंगुळ बु तालुका लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देशमुख करीत आहेत.