विद्यालयातील भगवती महादेव कदम हिने ९८.८० टक्के गुण घेत प्रथम, भाग्यश्री अनंत बावणे हिने ९८.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, ऋषिकेश रमाकांत भुजबळ याने ९७.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यालयातील १६पैकी १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.
सरपंच विनीताताई शिवाजीराव बावणे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष जनक गायकवाड, शिवाजीराव बावणे, उपसरपंच अंकुश गणगे, संस्थेचे उपाध्यक्ष शरयु गायकवाड, संदीपान गायकवाड, श्रीमंत जाधव, नितीन दहातोंडे, बालाजी झारे, सहशिक्षक डी. यु. खंडागळे, एस. एल. भंडारे, सी. बी. गरड, व्ही. व्ही. पुरी, एच. व्ही. डोईफोडे, के. के. शिंदे, एस. एम. चव्हाण, ओ. आर. गिरी, आर. आर. सूर्यवंशी, ए. डी. नरवडे, एम. डी. इंगळे उपस्थित होते.