दरदिन हजाराे लाेकांची ये-जा
लातुरातील गंजगाेलाई परिसरात प्रमुख बाजारपेठ आहे. शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी येथे नागरिकांसह वाहनांची माेठी गर्दी असते. हजाराे नागरिकांचा या परिसरात दरदिन वावर आहे, तर बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी कायम आहे.
फूटपाथ नावालाच...
महात्मा गांधी चाैक ते गंजगाेलाई मार्गासह बाजारपेठेतील फूटपाथ नावालाच राहिले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपले साहित्य ठेवत अतिक्रमण केले आहे. पादचाऱ्यांना वावरताना अडचणींचा सामना करावा लागताे आहे. काही व्यापाऱ्यांनी पाेटभाडेकरू ठेवत फूटपाथच काबीज केला आहे.
अतिक्रमण वाढले...
गंजगाेलाई परिसरातील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून फारशी कारवाई केली जात नसल्याचे समाेर आले आहे. यातून रस्ते मात्र अरुंद बनले आहेत. अतिक्रमणे हटवून रस्ता माेकळा करण्याची गरज आहे.
चालत जाताना भीती...
महात्मा गांधी चाैक ते गंजगाेलाई, गूळ मार्केट चाैक, हनुमान चाैक ते सुभाष चाैक, गंजगाेलाई ते राजर्षी शाहू महाराज चाैक परिसरात चालत जाताना भीती वाटते. वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढणे कठीण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून वाहनांच्या गर्दीतून चालताना मनात धाकधूक असते.
- अमाेल गायकवाड, लातूर
शिस्त लावण्याची गरज...
गंजगाेलाई परिसरातील बाजारपेठ प्रमुख आहे. येथे दरदिनी काेणत्या ना काेणत्या खरेदीसाठी आम्हाला जावे लागते. हा परिसर सतत वर्दळीचा आहे. येथे बेशिस्त वाहनांमुळे अनेकदा वाहतूक काेंडी हाेत आहे. परिणामी, चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
- वासुदेव जाधव, लातूर
अधिकारी म्हणतात...
लातूर शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाताे. दिलेल्या पार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग करावे, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, काही दुकानांसमाेर वाहनधारक बेशिस्त पार्किंग करतात. अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाताे. ही कारवाई सुरू असते.
- सुनील बिर्ला, वाहतूक शाखा, लातूर