शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
3
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
4
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
5
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
6
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
7
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
8
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
9
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
10
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
11
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
13
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
14
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
15
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
16
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
17
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
18
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
19
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
20
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच

HSC Result 2024: लातूर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल, यंदा दोन टक्क्यांची वाढ

By संदीप शिंदे | Published: May 21, 2024 1:11 PM

लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावीचा निकाल ९०.३७ टक्के लागला होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली

लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, लातूर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षी ९०.३७ टक्के निकाल होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, लातूर विभागात नांदेड ९१.११, धाराशिव ९१.१७ तर लातूर जिल्ह्याचा ९४.३० टक्के निकाल लागला असून, विभागात लातूर जिल्हा अव्वल ठरला आहे.

लातूर विभागात बारावी परीक्षेसाठी ९२ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ९१ हजार ५२८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात १२ हजार १६९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ३५ हजार ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ३१ हजार ५०९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ५८०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ८४ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाचा ९२.३६ टक्के निकाल लागला आहे. 

लातूर विभागात विज्ञान शाखेतून ५० हजार ६६५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यात ४९ हजार २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.८१ टक्के निकाल लागला आहे. तर कला शाखेतून ३० हजार १४३ विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ६७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कला शाखेचा निकाल ८४.१० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत लातूर विभागातील ८३६५ विद्यार्थी नोंदणीकृत होते. यात ७ हजार ६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वाणिज्य शाखेचा ९२.३१ टक्के निकाल लागला आहे. तसेच एचएससी व्होकेशनलचे ३३१९ पैकी २६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ८३.४९ टक्के निकाल लागला असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.

दोन टक्क्यांनी निकाल वाढला...लातूर विभागीय मंडळाचा मागील वर्षी बारावीचा निकाल ९०.३७ टक्के लागला होता. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली असून, ९२.३६ टक्केे निकाल लागला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळात लातूर सातव्या क्रमांकावर असून, कोकण विभाग अव्वल आहे. लातूर विभागात ९१ हजार ५२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८४ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९२.३६ टक्के निकाल लागला आहे. 

टॅग्स :laturलातूरHSC / 12th Exam12वी परीक्षा