शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 9:46 PM

Maratha reservation : खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अहमदपूर (जि. लातूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सहा वेळा उपोषण केले. मात्र, शासनाने दखल घेतली नाही आणि आरक्षणही दिले नाही. या नैराश्यातून तालुक्यातील हासरणी येथील एका पती - पत्नीने बुधवारी रात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ज्ञानोबा मारोती तिडोळे (३८), चंचलाबाई ज्ञानोबा तिडोळे (३४, रा. हासरणी, ता. अहमदपूर) असे विषारी द्रव घेतलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पाचवेळा उपोषण केले. १७ सप्टेंबरपासून सहाव्यांदा उपोषणास सुरुवात केली होती. त्यांच्या समर्थनार्थ तालुक्यातील हंगरगा येथील जयराम पवार यांनीही अहमदपुरात बेमुदत उपोषण सुरू केले होते. 

या उपोषणात ज्ञानोबा तिडोळे सहभागी झाले होते. बुधवारी सायंकाळी जरांगे-पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची माहिती समजली. तेव्हा सहावेळा उपोषण करूनही सरकारने दखल घेतली नाही. तसेच मराठा आरक्षण दिले नाही. त्यामुळे नैराश्यात आलेल्या ज्ञानोबा तिडोळे व त्यांची पत्नी चंचलाबाई तिडोळे यांनी विषारी द्रव घेतले.

आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोतआरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने आपल्या अकरावीतील मुलीचे व दोन लहान मुलांचे आता कसे होईल, या नैराश्यातून ज्ञानोबा तिडोळे यांनी आपली बहीण इंदुबाई तुकाराम हेंडगे, चुलत भाऊ व इतर नातेवाइकांना फोन केला. आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोत, असे सांगून या पती-पत्नीने बुधवारी रात्री ८:३० वा.च्या सुमारास विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांना वेळीच येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणlaturलातूर