शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
3
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
4
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
5
वर्षभरात अर्धी होतेय Smarphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
6
फिल्मी क्विनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
7
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
8
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
9
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
10
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
11
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
12
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
13
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
14
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
15
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
16
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
17
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
18
'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग
19
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
20
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड

पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 8:12 PM

किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.

राजकुमार जोंधळे / किनगाव (जि. लातूर) : ‘पंकजाताई निवडून नाही आल्या तर सचिन गेला...’ असा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ट्रकचालक सचिन मुंडे (३८, रा. येस्तार, ता. अहमदपूर) यांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आल्याची घटना अहमदपूर-अंधोरी रोडवरील बोरगाव पाटीनजीक घडली. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी नोंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील शेतकरी कुटुंबातील अविवाहित युवक सचिन कोंडीबा मुंडे हा व्यवसायाने ट्रकचालक हाेता. ट्रकचालक असलेला सचिन आई-वडील आणि भावाचा उदरनिर्वाह चालवीत हाेता. त्याने काही दिवसांपूर्वी ‘पंकजाताई नाही जर आल्या... तर सचिन गेला...’ असा व्हिडिओ व्हायरल केला हाेता. दरम्यान, त्याचा मृतदेह बाेरगाव पाटीनजीक शुक्रवारी रात्री आढळून आला आहे. 

पाेलिस म्हणतात, चालकाने बोरगाव पाटीवर प्रवासी चढ-उतार करण्यासाठी अहमदपूर आगाराची यलदरवाडी मुक्कामी बस (एमएच १३ सीयू ७९२९) शुक्रवारी रात्री नऊ वाजता थांबवली होती. दरम्यान, चालकाने प्रवासी चढल्यानंतर बस पाठीमागे घेतली असता, पाठीमागे थांबलेल्या सचिनला बसचा जाेराचा धक्का लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सचिनच्या मृतदेहावर येस्तार येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात मृत सचिनचे काका संग्राम वैजनाथ मुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून बसचालकाविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.उपनि. रामचंद्र गोखरे हे करीत आहेत.

सचिनचा व्हिडिओ सर्वत्र झाला व्हायरल...

‘पंकजाताई नाही जर आल्या... तर सचिन गेला...’ असा सचिन मुंडे यांचा व्हिडिओ अहमदपूर तालुक्यातील सर्व व्हाॅटस्ॲप ग्रुप आणि साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगानेही पाेलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbeed-pcबीड