कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध असून तीन महिन्यांपासून विविध वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. १ मेपासून १८ वर्ष व त्यापुढील वयोगटातील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला गरज पडली तर रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढवण्याचीही गरज आहे. लस घेतल्यानंतर २ महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे जो व्यक्ती शहरातील कुठल्याही रक्तपेढीत रक्तदान करून लस घेण्यासाठी येईल त्याला रांगेत थांबावे लागणार नाही. रक्तदान केल्याचे कार्ड दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला लस घेण्यासाठी थेट आत प्रवेश दिला जाईल. यामुळे रक्तदात्याचा एका वेगळ्या पद्धतीने सन्मानही होणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
तरुणांना सहभाग नाेंदवावा...
सध्या कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला गरज पडली तर रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढवण्याचीही गरज आहे. लस घेतल्यानंतर २ महिने रक्तदान करता येत नाही. परिणामी, रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील १८ वर्षाहून अधिक वयाच्या तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.