...
कंधार बससेवा सुरू, प्रवाशांतून समाधान
जळकोट : उदगीर आगाराने उदगीर- कंधार ही बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. १५ ते २० वर्षांपासून उदगीर- कंधार ही बससेवा सुरू होती. परंतु, अचानकपणे ही बस बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत होती. ही बस बंद झाल्यामुळे जळकोट, वांजरवाडा, होकर्णा, उमरदरा येथील प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
...
शिवसेनेच्या वतीने जळकोट येथे वृक्षारोपण
जळकोट : शिवसेनेच्या वतीने जळकोट येथे रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शहरप्रमुख मन्मथ धुळशेट्टे, उपतालुका प्रमुख शंकर धोंडापुरे, विकास सोमोसे, धनंजय भांगे, बालाजी थोंटे, भीमाशंकर भ्रमण्णा, रामलिंग धुळशेट्टे, ज्ञानेश्वर मुसळे, व्यंकट डांगे, अनंत धुळशेट्टे, गोविंद बारसुळे, पूजल उळागड्डे, बलभीम सूर्यवंशी, डॉ. अंगद पांचाळ, रामदास माळी, सुनील कमलापूरे, हरिश जोशी, बाळू धोंडिहिप्परगे, अमोल सोनकांबळे, प्रभाकर धुळशेट्टे आदी उपस्थित होते.
...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेचे आवाहन
औसा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुक्यातील आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना पूरग्रस्तांसाठी मदत निधी आणि अत्यावश्यक साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरासह तालुक्यात बुधवारी वाहनाद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्या रेखाताई नागराळे, मुकेश देशमाने, शिवकुमार नागराळे, धनराज गिरी, संतोष गावकरी, वरुण देशपांडे, अनिल बिराजदार, विकास भोजने, हनुमंत येणगे, सोहेल शेख, अमोल थोरात, जीवन जंगाले, सतीश जंगाले, महादेव गुरुशेट्टे, उमाकांत गोेरे आदी उपस्थित होते.