शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

पशुपालकांसाठी महत्वाचे; अनुदान मिळवायचेयं, मग काढा पशुधनाचे आधारकार्ड!

By हरी मोकाशे | Published: January 08, 2024 6:07 PM

जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाईन नोंदणी सुरु

लातूर : गायीच्या दुधाला शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मिळविण्यासाठी अथवा हरवलेले आपले पशुधन ओळखण्यासाठी जनावरांचे आधारकार्ड (टॅग) काढणे महत्त्वाचे आहे. तसेच त्याची ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. जर टॅगिंग व ऑनलाईन नोंदणी न केल्यास पशुपालकांना सुविधा लाभ मिळणार नाही.

गायीच्या दुधाला शासनाच्या वतीने ५ रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यासाठी दुधाळ गाईंचे टॅगिंग आणि ऑनलाईन नोंदणी महत्त्वाची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढीबरोबर पशुधन विमा कार्यक्रमाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

भारत पशुधन ॲपवर माहिती...दुभत्या जनावरांचे टॅगिंग झाल्यावर भारत पशुधन ॲपवर शेतकऱ्यांनी पशुधनाची जात, वय, दैनंदिन व एकूण दूध उत्पादनाची माहिती भरायची आहे. ती दूध केंद्रात संकलित केली जाईल. तेथून ती खाजगी व सहकारी दूध संघाकडे जाईल. माहिती व प्रत्यक्षातील दूध संकलनात तफावत आढळल्यास भेसळ शोधणे अथवा अनुदान लाटण्यासाठी अधिकचे दूध दाखविता येणे अवघड होणार आहे. या टॅगिंगमुळे राज्यातील दूध संकलनाची एकूण माहिती सरकारकडे जमा होणार आहे.

जिल्ह्यात ५ लाख १४ हजार मोठी जनावरे...जिल्ह्यात एकूण गायी- म्हशी ५ लाख १४ हजार ६४५ आहेत. त्यात गायींची संख्या १ लाख ४२ हजार ८८१ इतकी आहे. शासनाकडून गायीच्या दूधाला अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दुधाळ गाईंबरोबर अन्य जनावरांचे टॅगिंग आणि ऑनलाईन नोंदणीची माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.

दोन आठवडे मोहीम...जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे टॅगिंग व ऑनलाईन माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे. पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लवकरात नोंदणी करावी. त्याचा पशुपालकांना लाभ होणार आहे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र