लातूर : शहरासह जिल्ह्यातील देवणी येथे सुरू असलेल्या मटक्यावर पाेलिसांनी छापा मारला. राेख रकमेसह मटक्याचे साहित्य असा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत लातूर येथील गांधी चाैक, शिवाजीनगर आणि देवणी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातुरात अन्वर हबीब शेख (वय ५५ रा. बुऱ्हाणपूर नगर, मळवटी राेड, लातूर) याने स्वत:च्या फायद्यासाठी लाेकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून कल्याण नावाचा जुगार चालविता हाेता. दरम्यान, पाेलिसांनी शुक्रवारी छापा मारला. यावेळी जुगाराचे साहित्य आणि राेख ९५० रुपये जप्त केले. याबाबत गांधी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत खंडू ज्ञानाेबा क्षीरसागर (वय २७, रा. इंडिया नगर, लातूर) यानेही लाेकांकडून पैस घेऊन आकड्यावर लावत मिलन डे नावाचा जुगार चालवित हाेता. यावेळी शिवाजीनगर पाेलिसांनी शुक्रवारी छापा मारला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि राेख ९ हजार ७०० रुपये जप्त केले. त्यांच्याविराेधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.
तिसऱ्या घटनेत देवणी येथे माधव केरबा हाळदे (वय २६, रा. लिंबगी, ता. औराद बाऱ्हाळी, जि. बिदर) हा लाेकांकडून पैसे घेऊन ते मटक्याच्या आकड्यावर लावून जुगार चालविता हाेता. दरम्यान, येथील मटक्यावर देवणी पाेलिसांनी शुक्रवारी छापा मारला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि राेख १ हजार ४९० रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.