औशात काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
By संदीप शिंदे | Published: April 17, 2023 05:53 PM2023-04-17T17:53:45+5:302023-04-17T17:59:21+5:30
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला.
औसा : जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या वक्तव्याने सरकारची पोलखोल केली आहे, असा आरोप करीत औसा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, माजी जिल्हा परिषद नारायण लोखंडे, हणमंत राचट्टे, दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, आनंद कांबळे, महेबूब कारभारी, पाशा शेख, हमीद सय्यद, ॲड. फय्याज शेख, हाजी शेख, निर्गुण सांळुके, खादर सय्यद आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.