किनगाव (लातूर) : अहमदपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या किनगाव येथे तिरंगी लढत झाली होती. एकूण ५७ उमेदवार आपले नशीब अमावित होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, निकाल जाहीर होताच विठ्ठलराव बोडके यांच्या नेतृत्वाखालील किनगाव परिवर्तन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केल आहे. सरपंचपदासह १५ सदस्य बोडके यांच्या पॅनलचे विजयी झाले आहेत.
किनगाव ग्रामपंचायत १७ सदस्यांची असून सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाीतल महिलेसाठी राखीव होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत रिपाइं (आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे यांच्या मातोश्री सुमित्राबाई एकनाथराव वाहुळे विजयी झाल्या आहेत. सदस्य पदाची माळ विठ्ठलराव बोडके, निजाम महेबूब शेख, निजाम घुडूलाल कुरेशी, धनराज बोडके, बसंतीबाई वैजनाथ दहिफळे, तारामती तुकाराम आमले, शिलाबाई महादेव इंदुलकर, गोदावरी ज्ञानोबा देवदे, मुमताज शब्बीर शेख, शुभम मुंढे, मंगल चंद्रकांत शिलगिरे, मिनाबाई बाबुराव चाटे, चंद्रप्रकाश हंगे, ताहेराबी खाजामियाँ तांबोळी, ललिता दादाराव कांबळे यांच्या गळ्यात पडली आहे. विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.