लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

By राजकुमार जोंधळे | Published: April 17, 2023 06:32 PM2023-04-17T18:32:43+5:302023-04-17T18:34:03+5:30

पंतप्रधानांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाविषयीची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

In Latur Congress Loud sloganeering in the 'Jawab Do' movement | लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

लातुरात काँग्रेस आक्रमक; ‘जवाब दो’ आंदोलनात जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

लातूर : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना आणि ३०० कोटींच्या केलेल्या आराेपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, यासाठी काँग्रेसच्यावतीने लातुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साेमवारी ‘जवाब दो... जवाब दाे...’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाविषयीची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहेत. पुलवामा घटनेत ४० जवान शहीद झाले. त्यात केंद्राची झालेली चूक निदर्शनाला आणून दिली, तरीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले गेले, असा आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

यावेळी स्मिताताई खानापुरे, सुभाष घोडके, गोरोबा लोखंडे, ॲड. बाबासाहेब गायकवाड, पृथ्वीराज सिरसाट, राजकुमार जाधव, चंद्रकांत धायगुडे, ॲड. देविदास बोरूळे पाटील, एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, बालाजी सोळुंके, प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, शरद देशमुख, स्वातीताई जाधव, केशरताई महापुरे, महेश काळे, आसिफ बागवान, मोहन माने, राजकुमार माने, मुकेश राजमाने, ओमप्रकाश झुरुळे, ज्ञानोबा गवळे, ॲड. अजित काळदाते, कांचनकुमार चाटे, नागसेन कामेगावकर, महादेव बरुरे, डॉ. हमीद बागवान, धनंजय शेळके, संजय ओहळ, बाप्पा मार्डीकर, सुरेश गायकवाड, सुलेखाताई कारेपूरकर, शीला वाघमारे, अनिता रसाळ, पूजा चिकटे, कमलताई शहापुरे, लक्ष्मीताई बटनपूरकर, कमलताई मिटकरी, मेघराज पाटील, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, पवन सोलंकर, अविनाश देशमुख, विजय चव्हाण, पवनकुमार गायकवाड, गोविंद कदम, राजेश कासार, समाधान गायकवाड, अमोल भिसे, महेश चव्हाण, लिंबराज पाटील, बालाजी मनदुमले, गोविंद केंद्रे, विकास कांबळे, श्रीकांत गर्जे, दयानंद कांबळे, अशोक सूर्यवंशी, नागनाथ कांबळे, बिभीषण सांगवीकर, संजय सुरवसे, करीम तांबोळी, पिराजी साठे, ॲड. अंगदराव गायकवाड, आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: In Latur Congress Loud sloganeering in the 'Jawab Do' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.