शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा

By संदीप शिंदे | Published: May 06, 2023 1:31 PM

ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ केंद्राची निर्मिती

लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वपुर्ण समजली जाणारी नीट परीक्षा रविवारी ५६ परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील २५ हजार ८०० विद्यार्थी सामोरे जाणार असून, ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ परीक्षा केंद्र आहेत. या सर्व केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार असून, दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रविवारी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. औसा, उदगीर, अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी सेंटर असून, लातूरातही ५३ केंद्र आहेत. सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असून, १.३० वाजता प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच २ ते ५ या वेळेत परीक्षा होणार असून, दिव्यांग विद्यार्थ्यांना १ तास ५ मिनिटांचा अधिकचा वेळ मिळणार आहे. सर्व केंद्रावर बायोमेट्रीक हजेरी असून, एनटीएच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तयारी करण्यात आली आहे. यंदाही लातूर तालुक्यातील गंगापूर, आर्वी, बाभळगाव, पेठ तर औसा तालुक्यातील हासेगाव, अलमला तसेच उदगीर, अहमदपूर या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. दरम्यान, परीक्षेपुर्वीच केंद्राबाबत विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडचणी सोडविण्यात आल्या असल्याचे नीट परीक्षेेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य सचिदानंद जोशी यांनी सांगितले.

साडेतीन हजार विद्यार्थांची भर...मागील वर्षी २२ हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साडेतीन हजार विद्यार्थी वाढले असून, २५ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. दरम्यान, यंदाही ग्रामीण भागात तीन केंद्र आल्याने पालकांना केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी घरुन लवकर निघावे लागणार आहे.

टॅग्स :laturलातूरexamपरीक्षा