शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

लातूर जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदार वाढले, संक्षिप्त यादी प्रसिद्ध

By हणमंत गायकवाड | Published: January 23, 2024 5:26 PM

९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळली

लातूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांची संक्षिप्त यादी प्रसिद्ध केली असून, गत निवडणुकांच्या तुलनेत १ लाख ७१ हजार २५९ मतदार वाढले आहेत. तर वेगवेगळ्या कारणांमुळे ९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. 

सध्या जिल्ह्यात एकूण १९ लाख ४५ हजार ७७१ मतदार असून, त्यापैकी ९ लाख २० हजार ७३६ महिला तर १० लाख २४ हजार ९७५ पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण करण्यात आले असून, १ जानेवारी २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी करता येते. २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत नोंदणी करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३ लाख २० हजार ८८ मतदार आहेत. तर शहर मतदारसंघात ३ लाख ७२ हजार १५९, अहमदपूर ३ लाख ३४ हजार ९३६, उदगीर राखीव मतदारसंघात ३ लाख ८ हजार ७७९, निलंगा ३ लाख १९ हजार ५५८ आणि औसा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९० हजार २५१ मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

जिल्ह्यात विधानसभानिहाय स्त्री-पुरुष मतदारमतदारसंघ पुरुष  स्त्रीलातूर ग्रामीण १६९६१४  १५०४७१लातूर शहर १९३३४९  १७८७८४अहमदपूर  १७७१४२  १५७७९३उदगीर राखीव १६१६०१ १४७१५८निलंगा  १६८६३९  १५०९१२औसा १५४६३०  १३५६१८एकूण १०२४९७५  ९२०७३६

घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी...मागील वर्षी २०२३ च्या अंतिम मतदारयादीमध्ये एकूण १९ लाख १४ हजार ५५८ इतकी मतदारसंख्या होती. त्यानंतर झालेल्या निरंतर प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणे याबाबी सुरू होत्या. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत मयत, स्थलांतरीत, दुबार मतदार सोडून त्यांची वगळणी दुरुस्ती करण्यात आली.

मतदानाचा टक्का वाढविणार...शहरी आणि ग्रामीण भागात गत निवडणुकीमध्ये ज्या केंद्रावर कमी मतदान झाले होते, त्या केंद्राची यादी तयार करून त्या केंद्रावर मतदार वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय, जिल्ह्यामध्ये जी संवेदनशील मतदार केंद्रे आहेत, त्यांचीही यादी निश्चित करण्यात आली असून, तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम लातूर जिल्ह्याला उपलब्ध झाल्या असून, त्यांची तपासणी करून त्या गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कडक पहाराही ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Votingमतदानlaturलातूर