शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांचे कामबंद; खेड्यापाड्यातील रुग्णसेवा ठप्प

By हरी मोकाशे | Published: January 16, 2023 4:07 PM

जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक आंदोलन

लातूर : शासन सेवेत कायम करावे तसेच गट ब चा दर्जा देण्यात यावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील उपकेंद्रातील आरोग्य सेवा ठप्प झाली.

आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड काळात उत्कृष्ट कार्य केले आहे. याशिवाय तेरा प्रकारच्या नियमित सेवा देतात. तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन ते पूर्ण करतात. विविध लसीकरणासह गरोदर मातांना सेवा, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची तपासणी करुन आरोग्य सेवा देतात. या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून आपल्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासन स्तरावर दखल घेतली गेली नसल्याने या डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलन करीत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला होता.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी गोडगे, सचिव डॉ. सविता भारती, कोषाध्यक्ष अजित पाटील, डॉ. किशाेर सालेवार, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. श्रध्दा डोंगरगावकर, डॉ. विष्णू गायकवाड, डॉ. योगिता मलकापुरे, डॉ. महेश चेंडकापुरे, डॉ. विष्णू पांचाळ आदींची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी...वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस देण्यात यावा. निश्चित वेतन ९० टक्के व कामावर अधारित वेतन १० टक्के द्यावे. जिल्हाबाह्य व जिल्ह्याअंतर्गत विनंती बदलीचे धोरण तात्काळ राबवावे. २३ निर्देशांक पीआयबी फॉरमॅट रद्द करावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बढती द्यावी, प्रवास, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.

तान्हुल्या लेकरांसह डॉक्टर महिला आंदोलनात...या आंदोलनात दोन- तीन महिला डॉक्टर आपल्या तान्हुल्या लेकरांसह सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात जिल्ह्यातील १६७ समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली.

टॅग्स :laturलातूरdoctorडॉक्टर