शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न

By हणमंत गायकवाड | Published: December 16, 2023 12:06 PM

अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे.

लातूर : यंदा सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशाच केली असून, रब्बीची पेरणी होऊन काढणीला पिके आले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा दोनशे ते अडीचशे रुपयांनी क्विंटलमागे दरात घट झाली आहे. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आणखीन विक्रीला सोयाबीन नेले नाही, त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये १३,८९३ सोयाबीनची आवक होती, तर सर्वसाधारण दर ४,८५० निघाला. यामुळे यंदा सोयाबीनचा दर वाढणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र आहे ऊस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला तर उसाकडे शेतकरी वळतात. पावसाच्या पाण्यावरच पीक काढायचे असेल तर सोयाबीन घेतले जाते. त्यानुसार जिल्ह्यात कालच्या हंगामामध्ये साडेचार लाख हेक्टर सोयाबीनचा पेरा झाला होता. पाऊस असा तसाच असला तरी बऱ्यापैकी उत्पन्न झाले आहे; मात्र दर मिळत नाही. प्रत्येक क्विंटल पाच हजार शंभरच्यावर यंदा सोयाबीनचा दर गेलेला नाही. त्यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे. परंतु, किती दिवस साठा करून ठेवावा. दर कधी वाढणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

बाजार समितीत शेतमालाची आवकलातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालाची आवक आहे.गूळ : ३९४गहू : ८८ज्वारी हायब्रीड : ०५ज्वारी पिवळी : ०८हरभरा : ४०३तूर : १४१उडीद :८९करडई :२७धने : ०५

सर्वाधिक नऊ हजार रुपये क्विंटल तुरीला दरलातूरच्या बाजारामध्ये सर्वाधिक तुरीला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे, तर त्या खालोखाल आठ हजार रुपये प्रति क्विंटल उडीदाला भाव आहे. पण, या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळे त्यांना या दराचा फायदा होत नाही, अशी स्थिती आहे. हरभऱ्यालाही जरा थोडा चांगला दर आहे. पाच हजार ५०० रुपये सर्वसाधारण प्रती क्विंटल हरभरा लातूरच्या बाजारात विकला जातोय. सोयाबीनची आवक १३,८९३ आणि सर्वसाधारण दर ४,८५० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी सोयाबीनचा दर कधी वाढेल, या आशेवर होते. मात्र, यंदा दर वाढला नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार