अध्यक्षस्थानी हभप माधव महाराज पंढरपूरकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, जि.प. सदस्य माधव जाधव, तुकाराम पाटील, सदाशिवराव पाटील, नाम फाउंडेशनचे विलास चामे, सरपंच संभाजी गायकवाड, उपसरपंच बालाजी चाटे, धनराज बोडके, अफजल मोमीन, अमोल चामे, जितेंद्र बदणे, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, संचालक श्याम पाटील, दिलदारभाई शेख, अविनाश चाटे, ज्ञानोबा दहिफळे, पंडितराव तांदळे, राजकुमार कराड, अनंतराव कराड, वैजनाथ कराड, वामनराव दहिफळे, संजय गायकवाड, मनोहर नागरगोजे, बाबुराव चाटे, उत्तमराव ईरले, भास्कर तांदळे, वसंत कराड, त्र्यंबक कराड, बालाजी तांदळे, श्रीकांत कराड, अशोकराव चाटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील यांनी हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. चिखली येथील बौद्ध वाडा येथील नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा काही समस्या मांडल्या. त्यात स्मशानभूमी शेड, नाली बांधकाम, रस्ते या मागण्या असून त्या लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन आ. पाटील यांनी दिले.