राजर्षी शाहू महाविद्यालय, राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित कायदेविषयक जाणिव जागृती राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी.आर. देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची उपस्थिती होती. न्या. कंकणवाडी म्हणाल्या, अलिकडे कायद्याबरोबरच मानसिकता आणि मोबदला किंवा भरपाई संदर्भाचा विचार केला जात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमतांचा विचार करुन कोणतेही निर्णय घेतले तर त्याविषयी त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही. राजर्षी शाहू महाविद्यालयात लवकरच कायदे विषयक सल्ला केंद्र सुरु करण्यात यावे त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवाय महाविद्यालयाने विकासासाठी दत्तक घेतलेल्या औसा तालुक्यातील वाघोली गावातील अत्याचाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्व मदत देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. प्रास्ताविक डॉ. प्रिती पोहेकर यांनी केले. तर परिचय प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी करुन दिला. सूत्रसंचलन डॉ. अनुजा जाधव यांनी तर आभार प्रा. सी.डी. बनसोडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
कायद्याद्वारेच लाेकशाही मुल्यांची रुजवणूक...
अयोग्य गोष्टी आणि चुकीच्या वर्तनाविषयी आपण नको तितके सहनशील झालो आहोत. याच्या विरोधात कोणत्याही माध्यमाद्वारे विरोध व्यक्त करत नाही. परिणामी अन्याय करणा-यांचे मनोबल उंचावते आणि त्यातून मोठे अपराध घडतात. प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असून कायद्याद्वारेच लोकशाही मूल्याची रुजवणूक चांगल्या प्रकारे करता येऊ शकते त्यातूनच वैचारिक प्रगल्भता समाजात येते. असे मत संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो कॅप्शन : राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना न्या. एस.डी.कंकनवाडी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, डॉ.पी.आर. देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे.