उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 04:43 AM2019-10-18T04:43:33+5:302019-10-18T04:43:42+5:30

ज्योतिरादित्य शिंदे यांची सरकारवर टीका

The industry is broken; Unemployment reached high | उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

Next

लातूर : भाजप सरकार काळात उद्योग जगताचे कंबरडे मोडले़ गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला़ दर दिवसाला आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात़ महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले, असे सांगत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास खुंटला आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ बार्शी रोडवरील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या पाच हजार मोठ्या आणि दहा हजार छोट्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ या सरकारला पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही़ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही़ परिणामी, शेतकºयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ हा अन्नदाता स्वत:चे पोट न भरता देशाचे पोट भरतो. परंतु, या सरकारने त्याला वाºयावर सोडले आहे़ आॅटोमोबाईलसह मोठेमोठे व्यवसाय बंद पडत आहेत.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, पंतप्रधान असोत की राज्याचे मुख्यमंत्री असोत ते समाज जीवनाच्या प्रश्नावर या निवडणुकीत बोलत नाहीत़ ३७० कलम आणि चांद्रायान याशिवाय त्यांच्याकडे मुद्दा नाही.

Web Title: The industry is broken; Unemployment reached high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.