शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

देवणीत पंचायत राज समितीने शिक्षण ,आरोग्य विभागाची केली पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:15 PM

गेल्या महिनाभरापासुन धास्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकारी यांनी आज सुटकेचा श्वास सोडला.

- रमेश कोतवाल /सतीश बिरादार

देवणी (लातूर ) : आज सकाळी पंचायत राज समितीच्या पथकाने आज शाळा ,पशुवैद्यकीय दवाखाना ,प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली. मात्र ग्रामपंचायतकडे समिती फिरकली नाही. तासभराचा दौरा आटपून समितीने देवणी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत शिक्षण व आरोग्य विभागावर आपले समाधान झाले नसल्याचे समितीने  सांगितल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. गेल्या महिनाभरापासुन धास्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकारी यांनी आज सुटकेचा श्वास सोडला.

आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह समितीत आ.श्रीकांत देशपांडे ,आ.भरत गोगावले ,आ.दत्तात्र्य सावंत ,सभापती सत्यवान कांबळे यांनी धनेगाव येथील जि.प.प्रा शाळेला भेट देवुन स्वयंपाक गृह ,विद्यार्थ्याची  चौकशी   केली.यावेळी १३ पाढा वाचावयास सांगितला अन् शाळेबद्दल समाधान व्यक्त केले.वलांडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देवुन प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला.दवाखान्यात रुग्णाची विचारपुस केली.रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवुन येथील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदाचा आढावा घेतला.शिवाय रुग्णाची काळजी घ्या ? वेळेवर उपचार करण्याचा सल्लाही दिला.यावेळी उपस्थित रुग्णाच्या व ग्रामस्थाच्या तक्रारी जाणुन घेतल्या अन् यापुढे अडचणी येणार नाहीत यासाठी खबरदारी घेण्याचा सज्जड सल्लाही समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

समितीसोबत उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ,सभापती सत्यवान कांबळे ,उपसभापती शंकरराव पाटील ,जि.प.सदस्य प्रशांत पाटील ,गटविकासअधिकारी सोपान अकेले ,गटशिक्षणाधिकारी उज्ज्वलकुमार कुलकर्णी ,तालुका कृषी अधिकारी नाथराव देशमुख ,तालुका आरोग्य अधिकारी दिलीप गुरमे ,वि.अ.आर.सी.जाधव ,गोपनवाड आदीची उपस्थिती होती.

समितीची सर्वानी घेतली होती धास्ती...समिती येणार असल्याने शाळा ,ग्रामपंचायत  ,दवाखाने या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली होती.गेल्या आठ दिवसापासुन रेकार्ड अद्यावत करणे ,रंगरंगोटी ,परिसर स्वच्छता याबाबीकडे विशेष लक्षदिले होते.दरम्यान आज समितीचा दौरा झाल्यानंतर सर्वानी सुटकेचा श्वास सोडला.मात्र केवळ समिती येणार म्हणुन करण्यात येणाऱ्या देखाव्यापेक्षा वर्षभर सर्वानी इमानदारीने नोकरी केल्यास धास्ती घेण्याची गरज नसल्याचेही यावेळी बोलताना दिसून आले  . 

राज्यमार्गावरच समितीचे मार्गक्रमण...उदगीर - निलंगा राज्यमार्गाच्या दुतर्फा तालुक्याचा विस्तार असताना समितीने फक्त राज्यमार्गावर असलेल्या कार्यालयाला भेटी देऊन आपला दौरा सोपा केला. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या अन् आर्थिक उलाढाल असलेली एकही ग्रामपंचायत न पाहिल्याने सर्वकाही अलबेल असल्याचे बोलले जात आहे. देवणीच्या आढावा बैठकीतही केवळ खातेप्रमुख यांनाच प्रवेश असल्याने फक्त तपासणी होती उलट तपासणी नव्हे असे समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :laturलातूरpanchayat samitiपंचायत समितीState Governmentराज्य सरकार