उदगीर (जि. लातूर) : उदगीर व जळकोटातील जनतेची साथ हीच माझी ऊर्जा आहे. मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसीसह एखादा मोठा उद्योग व आयआयटी, एम्ससारख्या संस्था आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी येथे दिली.
राज्याच्या मंत्रिमंडळात आ. संजय बनसोडे यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने त्यांचा येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे होते. यावेळी आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, एकनाथ महाराज लोमटे मलकापूरकर, बसवराज पाटील नागराळकर, ॲड. व्यंकट बेद्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, पंडित धुमाळ, रामचंद्र तिरुके, रिपाइंचे देवीदास कांबळे, बापूराव राठोड, मंजूरखां पठाण, भरत चामले, चंद्रकांत वैजापुरे, मुन्ना पाटील, माजी नगराध्यक्ष अफसर शेख, रमेश अंबरखाने, शिवाजीराव साखरे, मन्मथ किडे, मौलाना हबेबूर रहेमान, जितेंद्र शिंदे, ॲड. दीपाली औटे, उषा रोडगे, रामराव राठोड, पप्पू गायकवाड, प्रा. प्रवीण भोळे, अनिल इंगोले, बालाजी देमगुंडे, बाळासाहेब मरलापल्ले, कुणाल बागबंदे, नागसेन भन्ते आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे, सूत्रसंचालन रसूल पठाण, अनिता येलमटे यांनी केले. आभार पद्माकर उगिले यांनी मानले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार आमचे दैवत... -मंत्री संजय बनसोडे म्हणाले, मतदारसंघासाठी ९०० कोटींची वॉटरग्रीड योजना मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे पाणी समस्या जाणवणार नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार हे आपले दैवत आहे. देवेंद्र फडणवीस हा मोठ्या मनाचा माणूस असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. सत्कार सोहळा सुरू असताना कॅबिनेट मंत्री बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री हे विभाग मिळाल्याचे समजताच आणखी आनंदोत्सव साजरा झाला.