शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

खरीप पिकांना विम्याचे कवच; लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ५८ कोटींची बचत

By हरी मोकाशे | Published: August 07, 2023 7:30 PM

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ४ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी ८ लाख ३० हजार ५०५ प्रस्ताव सादर केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या एक रुपयात खरीप पीक संरक्षित योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ५८ कोटी ७२ लाख ५१ हजार ४६३ रुपयांची बचत झाली आहे.

जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९९ हजार हेक्टर आहे. यंदा मृगाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आर्द्रा नक्षत्रात पावसाने बरसात केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात पेरण्यांना प्रारंभ झाला. तद्नंतर मध्यम स्वरुपाच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. दरम्यान, अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई अशा विविध कारणांनी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली आहे. यंदा या योजनेअंतर्गत केवळ एक रुपयामध्ये पीकविम्याचे संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकार पीकविमा कंपनीकडे भरणार आहे. राज्य शासनाच्या या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योजनेत सहभाग नोंदविला आहे.

५ लाख ६६ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा...नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा होतो. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी सहभाग घेत ८ लाख ३० हजार ५०५ प्रस्ताव सादर केले आहेत. शेतकऱ्यांनी ५ लाख ६६ हजार ४७३ हेक्टरचा पीकविमा उतरविला आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी...जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी औसा तालुक्यात असून ६६ हजार ८९२ आहेत. अहमदपूर - ४३ हजार ५७४, चाकूर - ३८ हजार ६०, देवणी- २२ हजार २७५, जळकोट - १९ हजार १०१, लातूर- ५० हजार ३५२, निलंगा - ६४ हजार ७८१, रेणापूर - ३४ हजार १६५, शिरुर अनंतपाळ- १९ हजार २२३ आणि उदगीर तालुक्यातील ३९ हजार ३६ अशा एकूण ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.- रक्षा शिंदे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एवढी बचत...तालुका - प्रस्ताव - बचत रक्कमअहमदपूर - ११४९९० - ६ कोटी ५९ लाखऔसा - १२५९०० - ९ कोटी ७१ लाखचाकूर - ७६०८५ - ५ कोटी ८१ लाखदेवणी - ४८२७६ - ३ कोटी २० लाखजळकोट - ५७४६० - २ कोटी ७२ लाखलातूर - ७२७२९ - ७ कोटी ७३ लाखनिलंगा - १४६२६९ - ८ कोटी ९७ लाखरेणापूर - ५२०७५ - ५ कोटी ११ लाखशिरुर अनं. - ३६१५१ - २ कोटी ७० लाखउदगीर - १००५७० - ६ कोटी १३ लाखएकूण - ८३०५०५ - ५८ कोटी ७२ लाख

टॅग्स :CropपीकFarmerशेतकरीlaturलातूर