विनय नायडू , मुंबई - क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएल तीन वर्षानंतर परतले आहे. बुधवारी आयपीएल-७ ची एलिमिनेटर लढत गतविजेता मुंबई आणि दोन वेळेचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान रंगणार आहे. वानखेडे अस्तित्वात येण्याआधी सीसीआय कसोटी क्रिकेटचे मुख्य केंद्र होते. आयपीएल सामन्यांचे आयोजन वानखेडेवर करण्याचे मुंबई क्रिकेट संघटनेने ठरवताच ब्रेबॉर्नचे महत्त्व घटले. पण एलिमिनेटर सामन्याचे आयोजन थेट सीसीआयला देण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएल संचालन परिषदेने घेतल्यामुळे पुन्हा एकदा सीसीआयला वलय आले. २०११ च्या विश्वचषकासाठी वानखेडेचे नूतनीकरण होत असताना २०१० च्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या वाट्याला आलेले स्थानिक सातही सामने सीसीआयवर खेळविण्यात आले.मुंबईसाठी हे मैदान ‘लकी’ ठरले. सातपैकी सहा सामन्यात संघाने बाजी मारली होती. सीसीआयचे तत्कालीन प्रमुख आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी यांना मानद आजीवन सदस्यत्व बहाल करीत त्यांना सत्कार तेव्हा अंबानी यांनी मुंबई संघाचे होम ग्राऊंड सीसीआय असायला हवे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर वर्षानुवर्षे मुंबई संघाचे आवडते आणि लकी मैदान वानखेडेच राहिले. (वृत्तसंस्था)
आयपीएल परतले सीसीआयवर!
By admin | Published: May 28, 2014 4:00 AM