शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘मांजरा’ धरणावरील वीस पाणीपुरवठा योजनांकडे पाटबंधारे विभागाची ४७ कोटींची थकबाकी !

By हणमंत गायकवाड | Published: January 31, 2024 1:30 PM

तत्काळ थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधितांना दिला आहे.

लातूर : मांजरा धरणातूनलातूर शहरासह अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर, लोहटा, भालगाव, वडगाव, युसूफ वडगाव, माळेगाव, धनेगाव, आवाड शिरपुरा, शिराढोण, सारणी, साळेगाव, करंजकल्ला, दाभा, हिंगणगाव आणि चिंचोली माळी आदी वीस पाणीपुरवठा योजना आहेत. या सर्वांकडे मिळून पाणीपुरवठ्याची ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे. तत्काळ थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधितांना दिला आहे.

मांजरा प्रकल्पातून या वीस योजनांसाठी दररोज ७२ हजार ५८० घनमीटर पाण्याची उचल केली जाते. यापैकी लातूर शहरासह ६० हजार घनमीटर पाण्याची उचल दिवसाला केली जाते. या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला २.२५ द.ल.घ.मी. पाणी लागते. नित्यनेमाने पाण्याची उचल केली जात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नित्यनेमाने पाणीपट्टी भरली जात नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे. लातूर महापालिकेकडे २६ कोटी ४५ लाख ६१ हजार ५४६ रुपयांची थकबाकी आहे तर लातूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे २ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४५ रुपयांची थकबाकी आहे.

या योजनांकडे अशी आहे थकबाकी...योजना थकबाकीलातूर मनपा २६,४५६,१५४६मजिप्रा. लातूर २८१,५९,८४५न.प. अंबाजोगाई ५०,०७१,५०३न.प. कळंब १६,९४,७४०केज-धारूर बारा गावे ४४,३२,९८२म.औ.वि.म. लातूर १२,५५,७६९३२ग्रा.पं. लोहटा ९३,४४९७ग्रा.पं. भालगाव ३८,९३८ग्रा.पं. युसुफ वडगाव २५,५५,३६ग्रा.पं. माळेगाव ३२,४२२ग्रा.पं. धनेगाव ४७,८१९ग्रा.प. आवाड शिरपुरा १०,९०,४५सारणी ३३,९,१०७ग्रा.पं. साळेगाव १०,५७,६८ग्रा.पं. करंज कल्ला ११,३९,१३ग्रा.पं. दाभा ४०,२१०ग्रा.पं. हिंगणगाव ५०,२२६चिंचोली माळी ५० गावे योजना ८८,९५७धरणातील पाण्याची स्थिती...मांजरा धरणात सद्य:स्थितीत १६.०१ पाणीसाठा आहे.मृतसाठा ४७.१३० द.ल.घ.मी.

जिवंत पाणीसाठा २८.३३४ द.ल.घ.मी.२० पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. त्यातील केज, धारूर पाणीपुरवठा योजनेवर बारा गावांसाठी योजना आहे, तर चिंचोली माळी या योजनेवर १५ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. यंदा धरण क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे प्रकल्प भरलेला नाही. त्यामुळे सिंचनाचे पाणी बंद आहे. फक्त पिण्यासाठी राखीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.मांजरा धरणात सद्य:स्थितीत २८.३२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा योजनांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याची थकबाकी तत्काळ भरून जलसंपदा विभागाला सहकार्य करावे. संबंधित एजन्सीने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद केला जाईल. संबंधित संस्थांना या अनुषंगाने कळविण्यात आले आहे. सर्व योजनांकडे मिळून ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे.- सूरज निकम, शाखाधिकारी

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणी