देवणी येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी बांधण्यात आलेली निवासस्थाने अतिशय जीर्ण झाली आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून पोलीस कर्मचारी तिथे वास्तव्यास नाहीत. शिवाय, जुने निवासस्थान हे लहान आकाराचे असल्याने त्यात कुटुंबांना राहणे अशक्य आहे. या वसाहतीत पडझड झाल्यामुळे तसेच झाडे- झुडपे वाढल्यामुळे तिथे राहणे अशक्य ठरत आहे. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याची गैरसोय होत आहे.
परिणामी, पोलीस अन्यत्र राहत आहेत.
सध्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. या कर्मचाऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत रात्रंदिवस कर्तव्यावर राहावे लागत आहे. अशात घराचा प्रश्न गंभीर बनल्याने पोलीस अडचणीत आहेत, असे सांगितले. तेव्हा गृहमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न लवकर निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. अनिल इंगोले,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल कांबळे, महादेव आवाळे आदी उपस्थित होते.