शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

उदगीरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस बंधनकारक

By संदीप शिंदे | Published: August 22, 2023 4:43 PM

फ्रंट शीट घेणाऱ्या ८० चालकांवर पोलिसांची कारवाई

उदगीर : शहरातील ऑटो चालकांना आता खाकीचा ड्रेस घालून ऑटो चालवणे बंधनकारक करण्यात आले असून, ड्रेस न वापरणाऱ्या व फ्रंट सीटवर प्रवाशी घेणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मोहीम शहर पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

उदगीर शहरात ४ हजार बेकायदेशीर ऑटो सुरू आहेत. केवळ १ हजार ऑटो परवानाधारक आहेत. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी शहरातील ऑटोंना शिस्त लावण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ऑटो चालकांना खाकीचा ड्रेस घालून ऑटो चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ड्रेसविना ऑटो चालवीत असतील किंवा फ्रंट सीटवर प्रवाशी घेऊन ऑटो चालवीत असतील त्या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात ८० ऑटो चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.

उदगीरात वाहतुकीची कोंडी कायम...सध्या हातगाडे व ऑटो रस्त्याच्या मध्यभागी थांबून वाहतूकीची कोंडी करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पोलीस चौकीसमोर हातगाडा थांबून वाहतुकीची कोंडी करीत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. पालिका प्रशासनाकडून शून्य कार्यवाही असल्याने आता उदगीरच्या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालत जाणे कठीण झाले आहे. उदगीर शहरात पालिका प्रशासन आहे की नाही असा प्रश्न उदगीरकरांना पडला आहे.

टॅग्स :laturलातूरauto rickshawऑटो रिक्षा