शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
2
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
3
संपादकीय: अभिजात मराठी!
4
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
5
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
6
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
7
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
9
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
10
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
11
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
12
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
13
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
15
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
16
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
17
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
18
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
19
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
20
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग

By हरी मोकाशे | Published: July 05, 2024 5:20 PM

लातूर जिल्ह्यात ९६.३३ टक्के पेरण्या पूर्ण

लातूर : जिल्ह्यात यंदा वेळेवर मृग बरसल्याने आणि त्यानंतर मध्यंतरी आर्द्राचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. आतापर्यंत ९६.३३ टक्के पेरा झाला आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात खरीपाचे ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र आहे. हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दरम्यान, मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली. पीकही चांगले उगवू लागले. तद्नंतर पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. मात्र आर्द्रा नक्षत्राचा पाऊस झाला. त्यामुळे दिलासा मिळाला. शिवाय, रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९६.३३ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आठवडाभरात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

कडधान्याचा पेरा वाढला...तृणधान्य - ५९४२कडधान्य - ८०१३७गळीतधान्य - ४७५२५०एकूण पेरा - ५७७४७७

जिल्ह्यात सोयाबीनची ११० टक्के पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४७४८८१तूर - ६७७९१मूग - ६६१०उडीद - ५७२६कापूस - १६१५८तीळ - १३७ज्वारी - १९६

आतापर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस...तालुका - पाऊस (मिमी)लातूर - २७३.२औसा - ३०५.४अहमदपूर - १९४.९निलंगा - २४५.६उदगीर - १७४.८चाकूर - २५५.८रेणापूर - ३०७.९देवणी - १८२.८शिरुर अनं. - १९७.०जळकोट - १२५.८एकूण - २३९.८

लातूर, औश्यात १०३ टक्के पेरणी...जिल्ह्यात खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा तालुक्यात प्रत्येकी १०३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अहमदपूर- ९४.०६, निलंगा - ८९.१४, शिरुर अनंतपाळ - ९४.३४, उदगीर - ९४.१५, चाकूर - ९८.८४, रेणापूर -९९.४५, देवणी - ८५.८८, जळकोट तालुक्यात ९५.७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरणी देवणी तालुक्यात झाली आहे.

कोळपणी, खुरपणीत शेतकरी व्यस्त...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. पीक चांगले उगवले आहे. पिकांत तण दिसत असल्याने शेतकरी कोळपणी, खुरपणीच्या कामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत.

रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास सल्ला घ्या...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पीकही चांगले उगवले असून सध्या बहरत आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. दरम्यान, पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.- आर.टी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर