- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरातील उद्याेगभवन परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील गांजूर येथील रहिवासी असलेल्या कुटुंबाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी लातुरात भाड्याने घर घेवून ठेवले हाेते. दरम्यान, त्याला खासगी शिकवणीही लावली हाेती. साेमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उद्याेग भवन परिसरातील एका इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन शाळकरी मुलाने उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक दिलीप सागर, सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीवरुन साेमवारी रात्री अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
एकुलता एक मुलगा; शिक्षणासाठी लातुरात मयत मुलाचे वडील हे शेतकरी असून, त्यांना एक मुलगा आणि दाेन मुली आहेत, अशी माहिती पाेलिसांनी दिली. आपला मुलगा डाॅक्टर व्हावा, यासाठी त्यांनी लातुरात भाड्याने घर घेवून वास्तव्य केले हाेते. दरम्यान, त्याला फाउंडेशन काेर्ससाठी शिकवणीही लावली हाेती. ताे नेहमीप्रमाणे साेमवारी सकाळी घरातून बाहेर पडला अन् एका इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत स्वत:ला संपविले, असे सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे यांनी सांगितले.