शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

लातूर : निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता

By हणमंत गायकवाड | Published: April 30, 2023 10:39 PM

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा एकतर्फी विजय

लातूर : निलंगा, औराद शहाजानी आणि देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय प्राप्त झाला असून, मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकून एकहाती सत्ता दिली आहे. निलंगा बाजार समितीत १८ पैकी १८, देवणी बाजार समितीत १८ पैकी १६ आणि औराद बाजार समितीत १८ पैकी १६ जागांवर निलंगेकर पॅनलचा विजय झाला आहे. या तिन्हीही बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

निलंगा बाजार समितीत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक झाली. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलसमोर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर तसेच औसा मतदारसंघाचे भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांनी पॅनल उभे करून आव्हान दिले होते. मात्र, अरविंद पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयश्री खेचून आणला. विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही. पराभवाची धूळ चारली.

औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपने १८ पैकी १६ जागांवर विजय खेचून आणला. दोन जागा व्यापारी असोसिएशनला मिळाल्या. एकतर्फी विजय संपादन करून पुन्हा औराद शहाजानी बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पॅनलला यश आले आहे. फक्त दोन आडत व्यापारी असोसिएशनने जिंकल्या. निलंगा व औसा या दोन मतदारसंघातील गावांचा समावेश या बाजार समितीत आहे. ५९ गावचे कार्यक्षेत्र असून, १४ गावे औसा मतदारसंघात येतात.

देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा झेंडा...देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेसप्रणीत पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर तसेच अरविंद पाटील निलंगेकर, भगवान पाटील तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली आणि विजयश्री खेचून आणला. दरम्यान, विजयी उमेदवारांची नावे घोषित होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढली. काशिनाथ गरीबे, मनोहर पटणे, बाबूराव इंगोले, अशोक लुल्ले, नागेश जिवणे, किशोर निडवंचे, अनिल पाटील, कुमार पाटील, सतीश पाटे, नामदेव कारभारी, प्रशांत पाटील, हनुमंत बिराजदार, रामलिंग शेरे, तुकाराम पाटील, राजू गुणाले, राजकुमार मुर्गे, रमेश मन्सुरे, विजयकुमार लुल्ले, अमर पाटील, ओम धनुरे, बालाजी सूर्यवंशी, अट्टल धनुरे, ईश्वर पाटील, सलीम उंटवाले आदी कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

निलंगा बाजार समितीतील विजयी उमेदवार...सहकारी संस्था मतदारसंघ शिवकुमार चिंचनसुरे, रामकिसन सावंत, गुंडेराव जाधव, लालासाहेब देशमुख, दयानंद मुळे, अरविंद पाटील, श्रीरंग हाडुळे तसेच सहकारी संस्था महिला मतदारसंघातून भागिरथी जाधव, कस्तुरबाई जाधव. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून मन्मथ महालिंग स्वामी, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून काशिनाथ म्हेत्रे, ग्रामपंचायत मतदारसंघातून रोहित पाटील, तुकाराम सोमवंशी, अनुसूचित जाती मतदारसंघातून हनमंत पाटील, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून अनिल कामळे, व्यापारी मतदारसंघातून संतोष बरमदे, योगेश चिंचनसुरे हे विजयी झाले, तर हमाल मतदारसंघातून सतीश कांबळे यांचा टॉसवर विजय झाला.

टॅग्स :laturलातूरElectionनिवडणूक