शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
3
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
4
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
5
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
6
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
7
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
8
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
9
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
10
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
11
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
12
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
13
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
14
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
15
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
16
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
17
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
18
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
19
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
20
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यात पंधरा दिवसांपासून अडथळा

By हणमंत गायकवाड | Published: April 27, 2023 8:08 PM

चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम

लातूर :लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असला तरी गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. धनेगाव हेडक्वार्टर्स येथील ३३ केव्ही सबस्टेशन येथील वीजपुरवठ्यामध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने लातूर शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याच कारणामुळे शनिवारचा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर लातूर शहरामध्ये पाणीटंचाई नाही. मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. पण, गेल्या पंधरा दिवसांपासून चार दिवसांत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. सातत्याने रोहित्र बिघडत आहे. वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा नियमाप्रमाणे केला जात नाही. शहरात गेल्या पंधरा दिवसांत अनेक भागांमध्ये आठ दिवसाला पाणी सोडले होते. आताही शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीज वाहिनी बंद असल्यामुळे पाणी उचलता येणार नाही, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, या ना त्या कारणामुळे लातूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात व धनेगाव परिसरामध्ये वादळ व अवकाळी पाऊस होत असल्याचे कारण महानगरपालिकेने दिले आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत आहे, असेही महापालिकेचे म्हणणे आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असून, त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करता येत नाही. शनिवारी २९ एप्रिल रोजी दिवसभर वीज वाहिनी बंद ठेवून वीज वाहिनीच्या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडणे, तसेच इतर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण महानगरपालिकेने दिले आहे. या गैरसोयीबद्दल शहरातील नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा उपायुक्तांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका