- राजकुमार जाेंधळेलातूर - काैटुंबिक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. भांडण करणाऱ्यांना पाेलिस वाहनात बसवत हाेते. यावेळी चाकूने भाेसकून दाेघांचा खून करण्यात केला हाेता. या खटल्यातील एका आराेपीला लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. माने यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
लातुरातील भांबरी चाैकानजीक भीमा गुलाब चव्हाण यांचे त्यांची पत्नी ललिता चव्हाण यांच्यात काैटुंबिक वाद हाेता. यातून झालेल्या भांडणामुळे भीमा चव्हाण यांनी त्यांचे भाऊ, पुतणे यांना बाेलावून घेतले हाेते. तर ललिता चव्हाण यांनीही आई, भाऊ आणि त्यांचे मित्र यांना बाेलावून घेतले हाेते. त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणातून अरुण भारत राठाेड आणि आनंद दिलीप चव्हाण यांचा चाकूने भाेसकून खून करण्यात आला हाेता. लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भांबरी चाैकात ही घटना घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पाेलिसांनी गुन्ह्याचा तपास करून लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले.
पाेलिस कर्मचाऱ्यांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण...लातूर न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने एकूण १६ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. यामध्ये सपाेनि. सर्जेराव भगवान जगताप, पाेलिस काॅन्स्टेबल अर्जुन हिरसिंग जगताप, युवराज रामगिर गिरी, तपास अंमलदार ए. एन. माळी यांची साक्ष सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयात झालेली साक्ष, सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. माने यांनी आराेपी राेहित शेळके याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील एस. एस. रांदड यांनी काम पाहिले. तर त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पाेलिस हवालदार जे. बी. माने यांनी सहकार्य केले.