लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:05 PM2022-01-19T12:05:38+5:302022-01-19T12:07:00+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले
लातूर : जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. यात कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे.
आतापर्यंतचे निकाल खालील प्रमाणे :
चाकूर नगरपंचायत 17 जागांपैकी महाविकास आघाडीला 8, प्रहारला 6 तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 9, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 7, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 3 विजयी झाले आहेत.
देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 12, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, भाजप 1 जागांवर विजयी झाले आहेत.