लातूर : जिल्ह्यातील चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवारी पार पडली. यात कॉंग्रेसने दोन ठिकाणी, भाजप आणि महाविकास आघाडीने एका ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे.
आतापर्यंतचे निकाल खालील प्रमाणे : चाकूर नगरपंचायत 17 जागांपैकी महाविकास आघाडीला 8, प्रहारला 6 तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 9, राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.जळकोट नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 7, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 3 विजयी झाले आहेत.देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस 12, राष्ट्रवादी 2, अपक्ष 2, भाजप 1 जागांवर विजयी झाले आहेत.