लातूर - चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील जवान संभाजी हरिबा केंद्रे (३८) हे गुरुवारी अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर होते. तेव्हा त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केंद्रेवाडी येथे रविवार सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवान संभाजी केंद्रे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. संभाजी केंद्रे हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. त्यांनी जम्मू काश्मीर, भोपाळ, श्रीनगर, अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव केंद्रेवाडी येथे रविवारी सकाळी ६ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.