शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Latur: माेबाइल दुकान फाेडणाऱ्या टाेळीतील पाच जणांना अटक, ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Published: October 14, 2023 7:38 PM

Latur News: लातूर येथील माेबाइल दुकान फाेडून १ काेटी ३५ लाखांचे माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- राजकुमार जाेंधळेलातूर - येथील माेबाइल दुकान फाेडून १ काेटी ३५ लाखांचे माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातुरातील चैनसुख राेडवरील बालाजी टेलिकॉम माेबाइल दुकान फाेडून, विविध कंपन्यांचे माेबाइल, टॅब, स्मार्ट वॉच, जुने माेबाइल, रोख रक्कम असा १ कोटी ३४ लाख ३७ हजार ७५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २८ ऑगस्टराेजी पहाटे घडली हाेती. याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संजीवन मिरकले, गांधी चौक ठाण्याचे पो.नि. प्रेमप्रकाश माकोडे यांच्या पथकांना सूचना देण्यात आल्या. याबाबत खबऱ्यांनी पाेलिसांना माहिती दिली. 

पाचही आराेपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे...माेबाइल दुकान मालेगाव (जि. नाशिक) येथील आंतरराज्य गुन्हेगारांच्या टाेळीने फाेडल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या अटकेसाठी धुळे, मालेगाव, नाशिक, गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वडोदरा शहरात पथके तैनात झाली. अखेर अकबरखान हबीबखान पठाण (३७), खैसरखान हबीबखान पठाण (२२), मंहमद अहमद उर्फ कल्लू असलम अंसारी (२२), झिब्राईल उर्फ जीब्बो इस्माईल अन्सारी (२०) आणि आमिनखान इस्माईल अन्सारी (२२, रा. मालेगाव जि. नाशिक) यांना अटक केली. त्यांच्याकडून १९५ माेबाइल, १० स्मार्ट वॉच, ०६ टॅब असा ७४ लाखांचा मुद्देमाल, कार असा मुद्देम जप्त केला. तपास सपोनि. नौशाद पठाण करत आहेत.

राज्यभरातील विविध शहरात २४ गुन्हे दाखल...सराईत टाेळीतील गुन्हेगारांवर महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, नाशिक, अकोला, परभणी, धुळे, नांदेड, धाराशिव, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात जवळपास २४ गुन्ह्यांची नाेंद आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही या टाेळीविराेधात गुन्हे दाखल आहेत. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर

या पाेलिस पथकांनी केली गुन्ह्याची उकल...ही कारवाई सपोनि. व्यंकटेश आलेवार, प्रवीण राठोड, पोउपनि. निखिल पवार, आक्रम मोमीन, खुर्रम काझी, राजेंद्र टेकाळे, दामोदर मुळे, रवी गोंदकर, राहुल सोनकांबळे, राम गवारे, राजेश कंचे, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजू मस्के, राहुल कांबळे, संतोष खांडेकर, मनोज खोसे, चंद्रकांत केंद्रे, नकुल पाटील, दयानंद आरदवाड, रणवीर देशमुख, दत्तात्रय शिंदे, भाऊसाहेब मंतलवाड, दयानंद सारोळे, अभिमन्यू सोनटक्के, नंदकिशोर शेंडगे, महेश पारडे, शिवाजी पाटील, विनोद चलवाड, महादेव मामडगे, विष्णू पंडगे, परमेश्वर स्वामी, सायबर सेलचे पो.नि. अशोक बेले, पोनि. गावंडे, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर