- राजकुमार जाेंधळेलातूर - फ्लॅटला टाळे लावून सर्वजण बाहेरगावी गेले असता, चाेरट्यांनी बंद फ्लॅट फाेडल्याची घटना साेमवार-मंगळवार दरम्यान घडली. चाेरट्यांनी साेन्याचे दागिने असा एकूण १९ लाख १३ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी याेगीराज पांडुरंग फड (वय ६२) हे आंबाजाेगाई राेडवरील विठ्ठल अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत. दरम्यान, साेमवारी ते आपल्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, साेमवार-मंगळवारी अज्ञात चाेरट्यांनी बंद असलेल्या फ्लॅटचा कडी-काेंडा ताेडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले साेन्याचे गंठण (आठ ताेळे), साेन्याचा नेकलेस हार (५ ताेळे ७०० ग्रॅम), साेन्याचे लहान गंठण (२ ताेळे ७५० ग्रॅम), कानातील साेन्याचे झुंबर (२ ताेळे ५०० ग्रॅम), कानातील साेन्याचे फूल (७ ग्रॅम), कानातील साेन्याचे खड्याचे फुल (६ ग्रॅम), कानातील साेन्याची साखळी जाेड (३.५ ग्रॅम), साेन्याचे जिरे मणी (५ ग्रॅम), माेतीचा पाच पदरी हार (४ हजार रुपये), एक पदीर पवळी हार, साेन्याचे गंठण (६ ताेळे ४०० ग्रॅम), साेन्याची अंगठी (१ ताेळे १०० ग्रॅम), साेन्याची फुलाची अंगठी (७ ग्रॅम), साेन्याची हिव्या खड्याची अंगठी (३ ग्रॅम), साेन्याच्या ती अंगठ्या (१५ ग्रॅम), प्रत्येकी एक ग्रॅमच्या ११ अंगठ्या असा एकूण १९ लाख १३ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी चाेरुन नेला आहे. घटनास्थळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी भेट देवून पाहणी केली.याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे करीत आहेत.
बंद घरांवर नजर ठेवणारी टाेळी लातूर जिल्ह्यात सक्रिय...दिवसभर बंद घरांची रेकी करणारी, नजर ठेवून ती घरे फाेडणारी टाेळीच लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सक्रीय झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही टाेळी बाहेर जिल्ह्यासस पर राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांच्या हाती लागली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक जण बाहेरगावी जातात. घरांना टाळे असते, अशा घरांना लक्ष्य करत चाेरट्यांनी लाखाे रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.