लातूर - पेट्रोलपंप चालक, हॉटेल्स मालक व खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी महिलांसाठी संरक्षित शौचालये निर्माण करावीत. १ आॅगस्टपर्यंत शौचालये निर्माण न केल्यास त्यांच्या व्यवसायाचे परवाने रद्द करण्यात येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील हॉटेल्स, पेट्रोलपंप चालकांना अकृषक वापर परवाना व हॉटेल, पेट्रोलपंप व्यावसायिकांना व्यावसायिक परवाना देताना नागरी सुविधा देणे बंधनकारक आहे. यामध्ये शौचालयांचा समावेश आहे.पेट्रोलपंप, हॉटेल्स व ट्रॅव्हल्स चालकांनी १ आॅगस्ट २०१८ पर्यंत महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध न केल्यास त्यांच्या व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. १ आॅगस्टनंतर जिल्ह्यातील हॉटेल्स, पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात येईल. ट्रॅव्हल्स कंपन्यांचाही आढावा घेण्यात येणार आहे. शौचालयाची सुविधा न देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.संरक्षित शौचालयांची यादी तयार होणार‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अंतर्गत एक अॅप्लिकेशन तयार करून त्याद्वारे जिल्ह्यातील संरक्षित शौचालयाची यादी तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी भारतीय स्त्री संघटनेची लातूर कार्यकारिणी सहकार्य करणार आहे. प्रवासात महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. स्वच्छतागृहाची दारे, खिडक्या व्यवस्थित असाव्यात. वीज, पाणी उपलब्ध करून शौचालयांची नियमित स्वच्छता व्हावी. प्रवासी वाहनांत अंतर्गत शौचालये असावीत. शौचालये पाश्चिमात्य व भारतीय शैलीची असावीत. स्वच्छता तपासणी यंत्रणा असावी. वाहनात स्टिकरद्वारे शौचालयाची यादी द्यावी. प्रवासी वाहन ठराविक ठिकाणी व कालावधीत न थांबल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, आदी अपेक्षा हॉटेल चालक, पेट्रोलपंप चालक व ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
लातुरात आता पेट्रोलपंप, हॉटेल, ट्रॅव्हल्स चालकांना शौचालय उभारणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:53 AM