लातूर : जेईई-मेनच्या जानेवारीत घेण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षेत जो स्कोअर अधिक असेल तो गृहीत धरून जेईई -अॅडव्हान्ससाठी विद्यार्थ्यांना पात्र ठरवले जाईल.
८ ते १२ जानेवारीदरम्यान जेईई-मेनची पहिली परीक्षा देशभरात घेण्यात आली. या परीक्षेसाठी ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, एनटीएने १०० परसेंटाईल मिळविलेल्या १५ विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुण्याचा राज आर्यन अग्रवाल, अंकितकुमार मिश्रा व कार्तिकेय गुप्ता या तिघांचा समावेश आहे. देशात तेलंगणाचे ४ विद्यार्थी १०० परसेंटाईलचे आहेत. त्याखालोखाल सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे.