लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला शुक्रवारी प्रतिक्विंटलला ९ हजार ६०१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. बाजार समितीत दिवसभरात १ हजार ५८ क्विंटल साेयाबीनची आवक झाली तर उडिदाला प्रतिक्विंटल ७ हजारांचा दर मिळाला. त्यापाठाेपाठ मुगाला भाव मिळाला आहे. एकाच दिवशी उडीद १ हजार ७४३ तर मुगाची १ हजार २८० क्विंटलची आवक लातूरच्या बाजार समितीत झाली आहे.
लातूरसह जिल्ह्यातील उदगीर, औराद शहाजानी, अहमदपूर, निलंगा आणि औसा बाजार समितीत साेयाबीनला उच्चांकी भाव मिळत आहे. शुक्रवारी लातूर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक झाली असून, प्रतिक्विंटलला कमाल दर ९ हजार ६०१ रुपये, किमान दर ८ हजार रुपये तर सर्वसाधारण दर ९,४५० रुपयांचा मिळाला आहे. उडिदाला प्रतिक्विंटलला कमाल दर ७,६०० रुपये, कमाल दर ५ हजार आणि सर्वसाधारण दर ७ हजार रुपयांचा मिळाला आहे. १४ क्विंटल करडईची आवक झाली असून, त्याला कमाल दर ४ हजार ९७० रुपये, कमाल ४ हजार ६६२ तर सर्वसाधारण दर ४ हजार ८५० रुपयांचा मिळाला आहे. मुगाला प्रतिक्विंटल कमाल दर ७ हजार २०० रुपये, किमान दर ५ हजार ७५१ तर सर्वसाधारण दर ६,७५० रुपयांचा मिळाला आहे. एकाच दिवसात मुगाची १ हजार २८० क्विंटलची आवक झाली आहे. एरंडीला प्रतिक्विंटलला कमाल दर ५ हजार, किमान दर ४,७५० रुपये तर सर्वसाधारण दर ४ हजार ९०० रुपयांचा मिळाला आहे. लातूरच्या बाजारात शुक्रवारी तुरीची ८६५ क्विंटलची आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल कमाल दर ६ हजार ८०० रुपये, किमान दर ६ हजार आणि सर्वसाधारण दर ६ हजार ४०० रुपयांचा मिळाला आहे. गुळाची १२६ क्विंटलची बाजार समितीत आवक झाली असून, त्याला कमाल दर २ हजार ९८४ रुपये मिळाला आहे. किमान दर २ हजार ९०० रुपये तर सर्वसाधारण दर २ हजार ९४० रुपयांचा मिळाला आहे. धणे कमाल दर ७ हजार १०० रुपये, किमान दर ६ हजार १०० आणि सर्वसाधारण दर ७ हजार रुपयांचा मिळाला आहे.
हरभरा ५ हजार ६५३ रुपयांचा दर...
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हरभऱ्याची आवक १ हजार ५२१ क्विंटलची झाली आहे. त्याला कमाल दर ५ हजार ६५३ रुपयांचा दर मिळाला आहे. किमान दर ४ हजार ४०० रुपये आणि सर्वसाधारण दर ५ हजार २०० रुपयांचा मिळाला आहे. रब्बी ज्वारीला कमाल भाव १ हजार ७०० रुपये, किमान भाव १ हजार ३०० आणि सर्वसाधारण १ हजार ५५० रुपयांचा दर मिळाला आहे. हायब्रीड ज्वारीला प्रतिक्विंटल कमाल दर १ हजार १०० रुपये, किमान दर ८०० आणि सर्वसाधारण दर ९०० रुपयांचा मिळाला आहे. गव्हाला प्रतिक्विंटलला कमाल २ हजार, किमान दर १ हजार ५५० आणि सर्वसाधारण दर १ हजार ७०० रुपयांचा मिळाला आहे. शुक्रवारी गव्हाची २ हजार ३६४ क्विंटलची आवक झाली आहे.